Thursday, 13 April 2017

आज मैं उपर , आसमा नीचे

परीक्षा संपली पण अनन्याची कलाकृती आली नाही म्हणजे पोरगी अभ्यासाला लागली असे लोकांचे गैरसमज होऊ लागले , आडून आडून चौकशा व्हायला लागल्या ... नसत बालंट कोण घेणार अंगावर हा घ्या पुरावा आमच्या परीक्षा काळातील अभ्यासाचा




आधीचा चार्ट आम्ही अलमोस्ट पार केला होता एव्हाना , म्हणून ह्यावेळी आम्ही रिस्कच घेतली नाही  ...उंची बघा फक्त ;-)

हा आम्ही काढायला घेतला तेंव्हा नेट वरून ते रॉकेट बघितलं नी काढलं मग वैतागलो नी घुसवली सगळी आमची कॅरेकटर्स त्यात   तेंव्हा कुठे बरं वाटलं आम्हाला




सगळ्यात खाली मर्क्युरी आहे बिचार्याची वाट लागली आहे , व्हीनस ला उचलून , व्हीनस कॉमेट बघून आश्चर्यचकित झालाय
कोण रे ते ,त्या यल्लोला चंद्र नी चांदणी म्हणतंय
कॉमेट आहे तो, काही म्हणून काही कळत नाही हो लोकांना
पृथ्वी मॅडम गॉगल लावून कूल दिसताहेत
मार्स चिडला आहे कारण त्याच्यावर किती ते सॅटेलाईट पाठवले आहेत

आता राईट साईड खाली हॉर्स हेड नेब्यूला आहे , त्याच्या वर सुपरनोव्हा नी कॉमेट आहे
वर अस्ट्रोनॉट अनन्या , तिच्या वर अँड्रॉमेडा (मंदाकिनी) ,


ज्युपिटर मोठा आहे म्हणून त्याला शेरीफ च पद दिल आहे
सॅटर्न त्याच्या रिंग्स सोबत हुलाहुप खेळतोय

नेपच्यून नी युरेनस साधारण एकाच वेळेस जन्माला आले नी त्यांचं आकारमान बऱ्या पैकी सेम असल्याने ते भाऊ आहेत , नी एकत्र पॉपकॉर्न खात एन्जॉय करताहेत  

राईट साईडला सप्तर्षी , डॉल्फिन नी मायनर स्टार क्लष्टर आहे ,त्यावर ufo आहे...
त्याच्यावर हस्त, मेजर स्टार क्लष्टर, होरायन आहे   (तुमच्या जवाबदारीवर शोध हो   ,आम्हाला विचाराल तर आधी एक तुक झेलायची तयारी ठेवा   )
सगळ्यात वर मेटीयर शॉवर आहे.

हुश्श, झालं बाई लिहून

अधिक माहितीसाठी, प्लिज सी न्या

(डिस्क्लेमर : माझा ह्या सगळ्याशी दूर दूर पर्यंत कोणता ही संबंध नाही  )

mani maau


Tuesday, 11 April 2017

बॅले डान्सर


आज सुट्टीचा पहिला दिवस आम्ही असा सत्कारणी लावला





आज मैं उपर , आसमा नीचे

परीक्षा संपली पण अनन्याची कलाकृती आली नाही म्हणजे पोरगी अभ्यासाला लागली असे लोकांचे गैरसमज होऊ लागले , आडून आडून चौकशा व्हायला लागल्या ... ...